Sunday, November 29, 2015

मराठी विनोद (संकलीत)


========================

मांडवामध्ये गण्याचा लग्नसोहळा सुरू होता.

 ब्राम्हणाने जमलेल्या सगळ्यांना उद्देशून विचारणा केली...

गण्याचं लग्न झाल्यामुळे जर कुणाला प्रॉब्लेम होणार असेल तर त्याने पुढं यावं. .... 

हे लग्न होऊ नये असं जर कुणाला वाटत असेल तर त्या व्यक्तीने आताच सांगावं नाहीतर मग या उभयतांना पुढच्या आयुष्यभर शांतपणे जगू द्यावं उभ्या आयुष्यात कधी वाटेला जाऊ नये. ....

ब्राम्हणाचे बोलणं संपताच सगळ्यात मागच्या रांगेतून एक सुंदर स्त्री पुढे येऊ लागली.

तिच्या हातात एक छोटं बाळ होतं...

सगळ्या मंडपात भयाण शांतता.... मग कुजबूज सुरू झाली.....
त्या स्त्रीला पाहताच नवऱ्या मुलीने गण्याच्या मुस्काटात मारली.
मुलीचे वडील त्यांची बंदूक आणायला धावले.
मुलीच्या आईने विषाची बाटली बाहेर काढली.
मुलीच्या भावांनी मुठी वळल्या.
पाहुणे मंडळींनी फेटे सोडले....

ब्राम्हणाने कसंबसं सगळ्यांना थोपवून पुढे आलेल्या युवतीला विचारलं,

ताई, तू का पुढे आली आहेस ?
.
.
ती म्हणाली,

* मागे काहीही ऐकू येत नव्हतं म्हणून!!!!*

😍😂😂😍😜😜

=================











Tuesday, November 24, 2015

विरंगुळा

विरंगुळा 

आजच्या धकाधकीच्या आयुष्यात प्रत्येक जणच विरंगुळ्याचे दोन क्षण शोधत असतो. ह्या वेळेत त्याला निव्वळ करमणूक हवी असते .  Just Stress Free व्हायचं असतं , relax  व्हायचं असतं . हाच उद्देश घेऊन हा ब्लॉग तयार करण्यात आला आहे. इथे जे काही तुम्हाला दिसेल त्यात काहीही सिरियस नाहि. इथे कोडी असतील, विनोद असतील आणि मुक्तछंद असेल. अट एकच Dont take anything seriously !


चला तर मग मजा करूया